In Motala taluka, a cripple has been beaten for voting 
अकोला

मतदानाच्या कारणावरून दिव्यांगास मारहाण; मूर्ती येथील घटना, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

मोताळा (बुलढाणा ) : तू कोणाला मतदान केले, असे म्हणून दिव्यांगाच्या पोटावर टोकदार वस्तू मारून जखमी केल्याची घटना मूर्ती येथे शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील मूर्ती येथील भिकाजी रामकृष्ण धुरंधर (42) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, फिर्यादी दिव्यांग असल्याने त्यांना चालता फिरता येत नाही. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. मतदान आटोपल्यानंतर भिकाजी धुरंधर हे स्वतःच्या घरात हजर असताना, गावातीलच गणेश काशिराम इंगळे याने त्यांच्या खिडकीजवळ उभा राहून भिकाजी धुरंधर यांना तू कोण्या पार्टीला मतदान केले, असे म्हणून शिवीगाळ केली.

तसेच खिडकीतून हात टाकून त्यांच्या पोटावर टोकदार वस्तू मारून जखमी केले. सदर घटना शुक्रवारी (ता.15) सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी भिकाजी रामकृष्ण धुरंधर यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी गणेश काशिराम इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोहेकाँ नंदकिशोर धांडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

Mumbai: तीन दिवसांपासून दार बंद, घर उघडतात ४० वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला; मालवणीतील संशयास्पद मृत्यूने खळबळ

SCROLL FOR NEXT